Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

कात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्य

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश

गोकुळनगर चौकात वाहतूक बदल

marathinews24.com

पुणे – शहरातील कात्रज–कोंढवा रस्त्यावर वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गोकुळनगर चौकातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वस्ती असल्याने नागरिकांकडून रस्तावरून ये-जा केली जाते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. याच पार्श्वभूमीवर वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.

हडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला – सविस्तर बातमी

गोकुळनगर चौकातील थेट ‘यू-टर्न’ (पंक्चर) बंद करण्यात येणार आहे. चौकात अनियंत्रित वळणे घेतली जात असल्याने वाहतूक कोंडी वाढत होती. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची मोठी रांग लागत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. नवीन नियोजनानुसार, खडी मशीन चौकाकडून खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी गोकुळनगर चौक ओलांडून सुमारे ५० मीटर पुढे जाऊन यू-टर्न घ्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे, खंडोबा मंदिराकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही खडी मशीन रस्त्यावर पुढे ५० मीटर अंतरावर यू-टर्नची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे चौकातील अनावश्यक वळणे कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होईल, असा पोलिसांचा दावा आहे.

दरम्यान, या बदलांबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या आहेत. ५ मे ते २० कालावधीत वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा येथे लेखी सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम आदेश जारी करण्यात येणार आहे. फायरब्रिगेड, पोलिस वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या नियमांमधून वगळण्यात येणार आहे. नागरिकांनी नवीन वाहतूक बदलांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×