गुन्हे शाखेच्या युनीट सातने केला पर्दाफाश
marathinews24.com
पुणे – व्हॉटसअॅप चॅटद्वारे वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या युनीट सातने पर्दाफाश केला आहे. यातून पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीत छोटुराम पटेल (वय २० रा. पाराशर हौसिंग सोसायटी, डाऊन टाऊन रोड खराडी) रामचंद्र बळीराम पांडुळे ( रा. राजाराम पाटील नगर लेन नं. १३ खराडी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांना हॉटेल शिवशाही पॅलेस खराडी या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली.
पुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचार – सविस्तर बातमी
व्हॉट्सअॅप चॅट करून एजंटमार्फत वेश्याव्यवसायासाठी मुली पाठवुन व्यवसाय केला जात होता. त्यानुसार पथकाने हॉटेल शिवसाई पॅलेस हॉटेलमध्ये छापा टाकला. पिडीत महिलेची सुटका करीत ७४ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे एपीआय मदन कांबळे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निलेश साळवे, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितिन धाडगे, किरण पलांडे, समाधान पाटील, मपोअं. सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.
























