Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

पुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचार

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत

दोघांना अटक, अनेक महिलांवर अत्याचाराची शक्यता

marathinews24.com

पुणे – स्वतःला ईश्वर असल्याचे भासवून भोंदू बाबाने एका कुटूंबियाचे मानसिक, शारिरीक, आर्थिंक शोषण केले. त्यानंतर भोंदूने मुलीवर वारंवार लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरातील उबाळेनगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी दि.१६ मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित आश्रमावर पोलिसांनी धाड टाकून मिश्राबाबासह दोघांना अटक केली आहे. दरम्यान, या आश्रमात अनेक महिलांसह मुली कार्यरत असून, त्यांच्या मार्फत अनेक महिलांवर लैिंगक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

शिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय – सविस्तर बातमी 

राधामोहन मिश्रा (वय ५९ रा. रेणुका पार्क, उबाळेनगर, खराडी ) आणि स्वामी कवल नयन (वय ५८ रा. खराडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहा महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खासगी कंपनीत सहायक मॅनेजर असलेल्या महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे कुटूंबिय परप्रांतीय असून, २००१ पासून त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी राधामोहन मिश्रा याने स्वतःला ईश्वर असल्याचे भासवून महिलेच्या कुटूंबियाला प्रभावित केले. त्याने पीडित महिलेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेउन तिला जाळ्यात ओढले. त्यांच्या कुटूंबियाचे मानसिक, भावनिक, आर्थिंक नुकसान केले. २००९ ते २०२६ कालावधीत आरोपी राधामोहन मिश्रा याने त्याचे सहकारी नयन आणि इतर महिलांच्या मदतीने तक्रारदार महिलेला वेळोवेळी मारहाण केली. त्यानंतर आरोपी राधामोहनने पीडित महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने आश्रमात इतरांच्या मदतीने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर खराडी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. संबंधित आरोपींना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×