Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

पुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

९ पिडीत मुलींची सुटका, दोघांना अटक

marathinews24.com

पुणे – नवले ब्रीज परिसरात मागील अनेक महिन्यांपासून राजरोजपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अखेर अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने कारवाई केली आहे. ९ मुलींची सुटका करीत दोघांना अटक केली आहे. दरम्यान, संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर महिला, मुली, तृतीयपंथी रस्त्यावर उभा राहून अश्लील वर्तन करणे, नागरिकांना त्रास देण्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यासंदर्भात स्थानिकांनी वारंवार स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांची दखल घेण्यात आली नसल्याचे अनेकांनी सांगितले.

अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

राकेश राजु पाटोळे (वय २७ रा. बेनकर चाळ, गणेशनगर, धायरी) मंगेश व्यंकट बनसोडे ( रा, गॅलेक्सी लॉज आंबेगाव, कात्रज रोड आंबेगाव पुणे मुळ पत्ता मु. पो. खेड, ता. लोहारा जि. धाराशिव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई २० जुलैला साई किरण लॉज आंबेगाव बुद्रुक, कात्रज आंबेगाव रोड, बर्गर किंग नवले पुल जवळ आंबेगावात करण्यात आली.

महिलांकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा केली. त्यानंतर साई किरण व गॅलेक्सी लॉजमध्ये छापा टाकुन लॉजमध्ये मध्ये वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ९ महिलांची सुटका केली. याप्रकरणी रिक्षा चालक राकेश पाटोळे, लॉज मॅनेजर मंगेश बनसोडे यांना अटक केली. ही कामगिरी गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, एपीआय विक्रम मिसाळ यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×