Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Accident : सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

Pune Road Accidents

४७ वर्षीय महिलेचा उपचारांपूर्वीच मृत्यू

marathinews24.com

पुणे – सिमेंट मिक्सरच्या धडकेत (Pune Accident) दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राजाराम पूल परिसरात घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुषमा संदेश पोखरकर (वय ४७, रा. राॅयल हाईट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाकलखल करण्यात आला आहे. याबाबत संदेश पोखरकर (वय ५०) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी 

Pune Accident पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सुषमा पोखरकर या २३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास कर्वेनगर परिसरातून सिंहगड रस्त्याकडे निघाल्या होत्या. राजाराम पुलाजवळ भरधाव मिक्सरने दुचाकीस्वार पोखरकर यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. मिक्सर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत. शहरात दिवसा सिमेंट मिक्सर, टँकर, डंपर अशा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहने बंदी आदेश धुडकावत असल्याचे दिसनू आले आहे.

नगर रस्त्यावर अपघातात महिलेचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. गीता रवींद्र चव्हाण (वय ३८, रा. कोलते पार्क, कावडे वस्ती, वाघोली, अहिल्यानगर रस्ता) Pune Accident असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गीता यव्हाण यांचा मुलगा समर्थ (वय १८) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार समर्थ आणि त्याची आई गीता हे २३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अहिल्यानगर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी वाघोली परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात गीता गंभीर जखमी झाल्या. दुचाकीस्वार समर्थ फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारांपूर्वीच गीता यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर टेम्पो चालकाला पोलिसंनी ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक महेश गळगटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×