Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

अज्ञात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

marathinews24.com

पुणे – डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना महापालिका भवन परिसरात घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी डंपर चालक आनंद सुरेश ठाकरे (वय २६, रा. साधू वासवानी उड्डाणपुलाजवळ, क्वीन्स गार्डन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश बेडीवाल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खासगी शिकवणीत गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक ठाकरे हा १९ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास महापालिका भवन परिसरातून निघाला होता. पीएमपी थांब्याजवळ डंपरने पादचाऱ्याला धडक दिली. अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघात प्रकरणात डंपर चालक ठाकरे याला ताब्यात घेण्यात आले. ठाकरे याच्याकडे चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची माहिती चौकशीत मिळाली. अपघातात मृत्यमुुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. ताे फिरस्ता असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल ओमासे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×