सीआयएसएफ, पुणे पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाचा सहभाग
marathinews24.com
पुणे – Pune Airport Security Drill : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षाविषयक सिद्धता तपासणे, तसेच संभाव्या घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह विविध यंत्रणांनी तपासणी मोहीम (माॅक ड्रिल) राबविली. विमानतळावर बाँम्ब ठेवल्याचे कळविण्यात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी बाँम्बसदृश वस्तू निकामी केली, तसेच प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्याचा सराव करण्यात आला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून शनिवारी पुणे आंताराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षाविषयक सिद्धता तपासण्यासाठी शनिवारी विशेष मोहीम राबविण्यात आली.
नवी मुंबईत आर्थिक वादातून तरुणावर गोळीबार – सविस्तर बातमी
मोहिमेत विमानतळाची सुरक्षा सांभाळणारे केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) अधिकारी, जवान, पुणे पोलिसांचे बाँम्ब शोधक नाशक पथकातील पोलीस कर्मचारी, तसेच अन्य यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास तपासणी मोहीम सुरू करण्यात आले. विमानतळाच्या आवारात बाँम्बसदृश वस्तू ठेवण्यात आली होती. या वस्तुचा शोध घेण्यात आला. उपकरणे, तसेच श्वान पथकाच्या मदतीने बाँम्बसदृश वस्तूचा शोध घेण्यात आला. एका पिशवीत बाॅम्बसदृश वस्तू आढळल्यानंतर ती सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.
बाँम्बसदृश वस्तू तातडीने निकामी करण्यात आली.
या मोहिमेत केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दल, हवाई दल, पुणे पाेलीस, आपत्ती निवारण पथक, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, तसेच विमानतळावरील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.




















