पुण्यात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला मारहाण करून लुटले; चौघे अटकेत
marathinews24.com
पुणे – Pune Bibwewadi Robbery Case : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण करुन त्याला लुटण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणी संदीप उर्फ सँडी चव्हाण, सनी भरगुडे, सनी साळवी, मयूर भोसले (सर्व रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास तक्रारदार दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी दुचाकीवरुन बिबवेवाडीतील पापळ वस्ती परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी तक्रारदार तरुणाला अडवले. सँडी चव्हाण याचा वाढदिवस असून, दारू पिण्यासाठी पैसे दे, अशी धमकी दिली. (Pune Bibwewadi Robbery Case) तरुणाने आरोपींना नकार दिला. त्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण करुन गळ्यातील सोनसाखळी, रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून नेला. पोलीस उपनिरीक्षक भुवड तपास करत आहेत.




















