Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यातील खलील शेख आत्महत्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

पुण्यातील खलील शेख आत्महत्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गुलटेकडी येथील खलील रज्जुलाल शेख (वय ५६) यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृताची पत्नी सुलताना खलील शेख (रा. गुलटेकडी डायस प्लॉट, नुराणी मशिदीजवळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी पुढे यावे- पोलिस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी

पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादीनुसार, २०१५ पासून १५ जुलै २०२६ पर्यंत आरोपींनी स्टेरिंग व्यवसायातील आर्थिक व्यवहारांवरून खलील शेख व त्यांच्या पत्नीला सातत्याने धमक्या देणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.

गुन्ह्यात विशाल केवतरी, सुनील अय्यर, त्यांचा मुलगा, रघु गोडा, सुनील बोरा, राजन सेठिया, हमीदभाई शेख व त्यांचा मुलगा, बाबासाहेब शेडगे व त्यांची पत्नी, माजी आमदार रवींद्र धंगेकर व त्यांची पत्नी, शाम कोळेकर तसेच शुभम नावाच्या व्यक्तीचा आरोपी म्हणून समावेश आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी बाबासाहेब शेडगे यांनी खलील शेख यांचे स्टेरिंगचे साहित्य जबरदस्तीने नेले होते. या सर्व प्रकारामुळे खलील शेख प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी आणि व्हिडीओ तयार करून संबंधित आरोपींना जबाबदार धरल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. त्यानंतर १५ जुलै रोजी त्यांनी राहत्या घरी सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×