Breking News
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीलाबारामतीत पुन्हा विमान अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी पुढे यावे- पोलिस आयुक्त अमितेश कुमार

अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी पुढे यावे- पोलिस आयुक्त अमितेश कुमार

अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी पुढे यावे : अमितेश कुमार 

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थांचे वाढते संकट केवळ कायदा-सुव्यवस्थेचे नाही, तर समाजासमोरील गंभीर आव्हान आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्यावतीने ‘सिक्युअर होरायझन फॉर यूथ’ या उपक्रमांतर्गत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र, नेहरू स्टेडियम येथे आयोजित अमली पदार्थ जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त संजय दराडे, गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते, राजेश बनसोडे यांच्या सर्व उपायुक्त उपस्थित होते.

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी 

अमितेश कुमार म्हणाले, व्यसनमुक्त युवक ही सुरक्षित आणि सुदृढ समाजाची खरी ताकद आहे. अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांचा नसून त्यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. युवकांनी चुकीच्या प्रवृत्तींना बळी न पडता जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. यावेळी सह पोलिस आयुक्त संजय दराडे यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन यांनी सादरीकरणातून अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्याचा समाजावर होणारा परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिमंत जाधव यांनी नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी तसेच पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांनी व्यसनमुक्त राहण्याची आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करण्याची शपथ घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×