Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune Crime : रील बनवण्यासाठी कोयता नाचवणारे दोघे जेरबंद

Pune Crime : रील बनवण्यासाठी कोयता नाचवणारे दोघे जेरबंद

अल्पवयीन ताब्यात

marathinews24.com

पुणे – Pune Crime : शहरातील फुरसुंगी परिसरात बुलेट गाडीच्या सायलेन्सरमधून फटाक्यासारखे आवाज काढून आणि हातात कोयता नाचवून रिल बनवून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. नागेश अशोक जाधव (वय १९) आणि हनुमान शिवाजी शिसोदे (वय २१, दोघेही रा. सिद्धिविनायक कॉलनी, गंगानगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कर्वेनगरात ज्वेलर्समधून सोन्याची चैन चोरीला – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा बुलेटचे फटाके फोडून व कोयता दाखवून दहशत माजवणारे काही जण गंगानगर परिसरातील एच. पी. पेट्रोल पंपजवळ थांबल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार मोरे यांना मिळाली होती. Pune Crime माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपी नागेश, हनुमान आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख रुपयांची बुलेट गाडी, लोखंडी कोयता असा २ लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या आदेशाचा भंग पुणे शहरात सध्या घातक शस्त्र बाळगण्यास बंदीचा आदेश (पोलिस अधिनियम ३७ (१)(२)(३)) लागू असतानाही, आरोपींनी विनापरवाना व बेकायदेशीररीत्या कोयता बाळगून रिल तयार करत शहरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांत भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्यासह पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×