Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Jewellers Theft : कर्वेनगरात ज्वेलर्समधून सोन्याची चैन चोरीला

Pune Bus Theft : बस प्रवासात ज्येष्ठ महिलेची ७० हजारांची बांगडी चोरी

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्वेलर्समधील मालकाचा विश्वास संपादित करुन त्यांच्याकडून सोन्याची चैन (Jewellers Theft) बघण्यासाठी हातात घेउन दोघांनी पोबारा केला आहे. सोन्याच्या चैनची किंमत दीड लाख रुपये असून, याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० सप्टेंबरला संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास कर्वेनगरातील थोरात कॉलनीत असलेल्या हर्ष ज्वेलर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांधीवाद हा शांतिमय क्रांतिवाद- डॉ. राजा दीक्षित – सविस्तर बातमी 

Jewellers Theft पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगरातील थोरात कॉलनीत हर्ष ज्वेलर्स असून, त्याठिकाणी २० सप्टेंबरला दोघेजण सोने खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी संबंधित तक्रारदाराला खोटे नाव व पत्ता सांगितला. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर ज्वेलर्स मालकांचा चोरट्यांची विश्वास संपादित केला. त्यानंतर काही वेळाने चोरट्यांनी तक्रारदाराकडून सोन्याची चैन पाहण्यासाठी हातात घेतली. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून दीड लाखांची सोन्याची चैन चोरुन दोघे आरोपी पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करीत आहेत.

फ्लॅटचे कुलूप तोडून २२ लाखांचा ऐवज चोरीला

फकटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील २२ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना चंदननगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चंदननगरमधील आनंद पार्क सोसायटीत राहायला आहेत. २६ सप्टेंबर रोजी तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून चोरट्यांनी साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा २२ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ३० सप्टेंबर रोजी तक्रारदार हे गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळाल्यानतंर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक भारत पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×