Breking News
Pune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनPune Solapur Road Accident : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यूPune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरी

Pune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटना

Pune Crime News

कोंढवा, फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : वाहन लावण्यावरुन झालेल्या वादातून मारहाणीच्या घटना घडल्या. कोंढवा आणि फुरसुंगी भागात या घटना घडल्या. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलासंह ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोंढवा भागात घरासमोर लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याने दाम्पत्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत संतोष वामन बरेकर (वय ४१, रा. संत ज्ञानेश्वरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील संत ज्ञानेश्वरनगर परिसरात बरेकर कुटुंबीय राहायला आहे. आरोपी याच परिसरात राहायला आहेत. एका आरोपीने तक्रारदार यांच्या घरासमोर दुचाकी लावली होती. २१ ऑक्टाेबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बरेकर यांनी त्याला दुचाकी काढण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपी बरेकर आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. आरोपींनी तक्रारदार बरेकर यांना बांबूने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक मासाळ तपास करत आहेत.

हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची भागात वाहन लावण्याच्या वादातून दोघांना मारहाण करुन मोटारीची काच फोडण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत योगेश अमृतराव देशमुख (वय ३८, रा. शिवरत्नसृष्टी सोसायटी, उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,एकाच कुटुंबातील एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख आणि आरोपी हे एकाच सोसायटीत राहायला आहेत. २१ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास रस्त्याच्या कडेला मोटार लावण्यावरुन झालेल्या वादातून आरोपींनी तक्रारदार देशमुख आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. तक्रारदाराच्या मोटारीची काच आरोपींनी फोडली. पोलीस हवालदार लोणकर तपास करत आहेत.

मद्यालयातील कामगाराला मारहाण

मद्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याने कामगाराला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. आरोपीने कामगाराला बाटली फेकून मारल्याने त्याच्या भुवईला जखम झाली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अंकित बलेश्वर पांडे (वय २२, रा. ससाणेनगर रस्ता, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २१ ऑक्टोबर राेजी दुपारी साडेचारच्या सुमारास मद्यालयात आला. आरोपीने मद्याची बाटली मागितली. पांडे याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपीने पांडे याला मद्याची बाटली फेकून मारली. बाटली भुवईजवळ लागल्याने दुखापत झाली. हवालदार तरडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×