Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : जुन्या भांडणातून मारहाण; सिमेंटच्या कट्ट्यावर डोके आपटले

Pune Crime News

विश्रांतवाडीतील रमाबाई आंबेडकर नगरमधील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : विश्रांतवाडीत जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीत त्यांचे डोके सिमेंटच्या कट्ट्यावर आपटल्याने दुखापत झाली. याप्रकरणी अभिषेक मानवतकर आणि त्याचा भाऊ (पूर्ण नाव उपलब्ध नाही; दोघेही रा. रमाबाई आंबेडकर नगर, विश्रांतवाडी, पुणे) यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल बाबू मासुळ (वय ३३, रा. मच्छी मार्केटच्या पाठीमागे, रमाबाई आंबेडकर नगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने २० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ ऑक्टोबर रोजी रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान रमाबाई आंबेडकर नगरमधील मोकळ्या प्लॉटमध्ये जुने भांडण उकरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. त्यांचे डोके सिमेंटच्या कट्ट्यावर आपटून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घरात घुसून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

Pune Crime News : उंड्रीतील घरात परवानगीशिवाय प्रवेश करून घरातील वस्तूंची तोडफोड आणि मारहाण केल्याचा प्रकार घडला. फिर्यादीच्या उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले असून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे. याप्रकरणी ऑस्टिन राजीव कालिया (वय ३५, रा. सी-४, १०३, न्याती एन्क्लेव्ह, उंड्री) आणि विश्वजीत बाळासाहेब कोंडेकर (वय ३८, रा. जय हिंद पार्क, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजीव पृथ्वीराज कालिया (वय ४५, रा. न्याती डिफेन्स एन्क्लेव्ह, उंड्री) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता आरोपींनी परवानगीशिवाय घरात प्रवेश केला. घरातील सामान घेऊन गेल्यानंतर तोडफोड केली आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत हाताने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×