Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : मुलांच्या खेळण्यावरून कुटुंबाला मारहाण; दगडाने डोक्यात मारहाण

Pune Crime News

सुतारदरा येथील काळूबाई कॉलनीत मुलांच्या खेळण्यावरून वाद

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादात एका महिलेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. दगडाने डोक्यावर वार झाल्याने महिला जखमी झाली. याप्रकरणी सुप्रिया धोत्रे, सुरेश ऊर्फ सुजल धोत्रे, मनोज धोत्रे आणि अण्णा धोत्रे (सर्व रा. गल्ली क्रमांक ३०, काळूबाई कॉलनी, गरजमित्र मंडळाजवळ, सुतारदरा, पुणे) यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वाती नितीन तोंडे (वय ३१, रा. त्याच परिसरात) यांनी फिर्याद दिली आहे.

जुन्या भांडणातून मारहाण; सिमेंटच्या कट्ट्यावर डोके आपटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गल्ली क्रमांक ३० येथे मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने त्या जखमी झाल्या.

पार्टीतील वादातून चौघांकडून मारहाण; हत्याराने केले जखमी

Pune Crime News  : येरवड्यातील सीबीआय कार्यालयामागे पार्टीदरम्यान झालेल्या वादातून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. धारदार हत्यार, दगड आणि हाताने केलेल्या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांच्या भावालाही दुखापत झाली. याप्रकरणी प्रताप लक्ष्मण काळे (वय ४१), बालाजी दीपक सकट (वय ४३), अर्जुन दीपक सकट (वय ३०) आणि वीरेश बालाजी सकट (वय २०; सर्व रा. रमाबाई आंबेडकर नगर, सीबीआय कार्यालयामागे, येरवडा, पुणे) यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्री भारतसिंग बाबरी (वय ४१, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास सीबीआय कार्यालयामागे पार्टी सुरू असताना पत्त्यांच्या डावातील पैशांवरून वाद झाला. मध्यस्थी सुरू असताना आरोपी क्रमांक एकने धारदार हत्याराने फिर्यादीला मारले. तिसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या भावाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली; चौथ्याने हाताचा चावा घेतला, तर दुसऱ्याने दगडाने मारहाण केली. घटनेची नोंद पुढे रात्री अडीचपर्यंतच्या वेळेसह आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×