Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वाहन चालकाला मारहाण

Pune Crime News

दुचाकीस्वाराविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून चारचाकी वाहनचालकाला शिवीगाळ करून डोक्यावर, तोंडावर आणि नाकावर ठोशांनी मारहाण करण्यात आली. उत्तमनगरमधील या घटनेत चालक जखमी झाला. याप्रकरणी अनोळखी दुचाकीचालकावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवनाथ लक्ष्मण चव्हाण (वय २५, रा. सुदर्शन मित्रमंडळाजवळ, कोंढवे-धावडे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मुलांच्या खेळण्यावरून कुटुंबाला मारहाण; दगडाने डोक्यात मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास हिरवाई गार्डनजवळ, प्रभात रोड येथे फिर्यादी चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला घेत असताना आरोपीने हॉर्न वाजवला. त्यावर फिर्यादीने हॉर्न का वाजवला, असे विचारल्याचा राग धरून आरोपीने शिवीगाळ केली आणि हाताने डोक्यावर, तोंडावर व नाकावर मारहाण केली.

जुन्या वादातून तरुणाला लाकडाने मारहाण

Pune Crime News सिंहगड रोडवरील नाना-नानी पार्कजवळ जुन्या वादातून १७ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडाने मारहाण करण्यात आली. या घटनेत तो जखमी झाला. याप्रकरणी यश शिरसाट आणि लखन वाघमारे (दोघेही रा. दांडेकर पूल, सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहन संतोष शेळके (वय १७, रा. गल्ली क्रमांक २१, दत्तमंदिराजवळ, जनता वसाहत, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाना-नानी पार्क, नवश्या मारुती चौकाजवळ ही घटना घडली. फिर्यादी आणि आरोपींच्या मित्रांमध्ये जुन्या वादाचे कारण होते. त्यातून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लाकडानेही मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×