Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

Pune Cyber Fraud : सायबर चोरट्यांकडून सव्वादोन कोटींची फसवणूक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

शेअर बाजार, डिजिटल अरेस्ट आणि आभासी चलनातील गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांना गंडा

marathinews24.com

पुणे – Pune Cyber Fraud : सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची दोन कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सिंहगड रस्ता परिसरातील तरुणाची सायबर चोरट्यांनी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तरुणाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते.

पुणे महापालिका भरती घोटाळा – सविस्तर बातमी 

तरुणाला पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात तरुणाने वेळोवेळी ५२ लाख रुपये जमा केले. चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी येरवडा भागातील एका ज्येष्ठ महिलेची ५५ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडगाव शेरी भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ६८ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक

लखनौतील गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी लष्कर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ५० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. पोलीस अधिकारी असल्याचे चोरट्यांनी त्यांना सांगितले. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीला अटकेची (डिजिटल ॲरेस्ट) भीती दाखविली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पोलीस उपनिरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ४६ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी समाज माध्यमात एक जाहिरात प्रसारित केली होती. आभासी चलन, परदेशी चलन व्यवहारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सपना देवताळे तपास करत आहेत.

मोटारीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पुणे-भरधाव मोटारीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सीताराम देशमुख यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी जकात नाका परिसरातून १० जुलै रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास पादचारी निघाला होता. त्या वेळी नगर रस्ता ओलांडताना भरधाव मोटारीने पादचाऱ्याला धडक दिली. अपघातानंतर मोटार चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे वय अंदाजे ४५ वर्ष आहे. तो फिरस्ता असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×