Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पुणे महापालिका भरती घोटाळा

बनावट नियुक्तीपत्रांच्या नावाखाली ४५ लाखांची फसवणूक, जेजुरी देवस्‍थानच्‍या विश्र्वस्‍तासह इतरांवर फसवणुकीचा गुन्‍हा

marathinews24.com

पुणे – महानगर पालिकेतील विविध विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे उमेदवारांची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सहदुय्यम निबंधकाला मारहाण; वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जेजुरी देवस्‍थानचे विश्र्वस्‍त राजेंद्र बबन खेडेकर यांच्‍यासह, महानगर पालिकेचे शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बसनोडे, तसेच त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महापालिकेच्या भरती प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी शलाका विनायक ढोणे (वय ४७) यांनी फिर्याद दिली असून, मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर व इतर ठिकाणी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी पुणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत अनेक बेरोजगार युवक-युवतींकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. त्यानंतर महापालिकेचे बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट नियुक्तीपत्रे तयार करून ती खरी असल्याचा आभास निर्माण केला.

उमेदवारांकडून रोख तसेच धनादेशाद्वारे रक्कम स्वीकारण्यात आली. अनेकांना नियुक्ती निश्चित झाल्याचे सांगून विश्वासात घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नियुक्ती न झाल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. यामध्ये केवळ ४५ लाख रुपयांची फसवणूकी बरोबरच शासकीय कागदपत्रांची बनावट निर्मिती करून त्यांचा वापर करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, बँक व्यवहार आणि संबंधित पुराव्यांची तपासणी सुरू आहे. शिवाजीनगर पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रकरणात नाव आलेले जेजुरी देवस्‍थानचे विश्र्वस्‍त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी दिलेल्‍या निवेदनात सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण स्वतः या प्रकरणातील तक्रारदार असून अनेक पीडितांना पैसे परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महापालिकेची नियुक्तीपत्रे, बदली आदेश, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, स्वाक्षऱ्या किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी आपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण आर्थिक व्यवहार, बँक खाते, कॉल रेकॉर्ड व डिजिटल पुराव्यांची निष्पक्ष चौकशी करून खरे दोषी समोर आणावेत आणि बदनामी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×