Breking News
मार्केट यार्डातील दुकानातून वेलदोडे, रोकड चोरीलाआंबेगाव परिसरात घरफोडी; १ लाखांचे दागिने चोरीलाकात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त वाहतूक बदलभटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

गौण खनिज स्वामित्वधन वसुलीसाठी पुणे जिल्ह्याला ३५० कोटींचे उद्दिष्ट

अवैध उत्खनन रोखण्यासाठी दक्षता पथके; ३१ मार्च २०२७ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश

marathinews24.com

पुणे – केंद्र शासनाच्या खाण व खनिजे (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ अंतर्गत राज्य शासनास गौण खनिजासंबंधी नियम तयार करण्याचे तसेच स्वामित्वधन निश्चित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ लागू केले असून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी गौण खनिजावरील स्वामित्वधन वसुलीचे जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी ३५० कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट देण्यात आले आहे.

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती – सविस्तर बातमी

राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांना महानगरपालिका, नगरपरिषद/नगरपंचायत आणि ग्रामीण क्षेत्रानुसार उद्दिष्टांचे विभाजन करून त्याची माहिती शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गौण खनिजावरील स्वामित्वधन, पर्यावरण शुल्क, उपकर, सेवा शुल्क व इतर महसुली रक्कमा संबंधित लेखाशिर्षनिहाय जमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. संबंधित विभागीय आयुक्तांनी या महसुली वसुलीवर नियमित नियंत्रण ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.सदर उद्दिष्टपूर्ती ३१ मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व अनधिकृत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील व उपविभाग स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मंजूर परिमाणापेक्षा जास्त उत्खनन होणार नाही यासाठी उत्खनन स्थळांची वेळोवेळी पाहणी करून ETS मशीनद्वारे मोजणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या जिल्ह्यांनी विशेष उपाययोजना आखून त्याबाबत शासनास अहवाल सादर करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

महसुली विभागांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक असून विभागीय आयुक्तांना आवश्यकतेनुसार विभागांतर्गत जिल्ह्यांच्या उद्दिष्टांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×