डीजे वादन मुद्दा, बापटांच्या आंदोलनाचा थोडासा परिणाम
marathinews24.com
पुणे – ध्वनी प्रदुषणविरोधात (Pune DJ Noise Pollution) आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्या आंदोलनाचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले. गणेश विसर्जन मिरवणूकीत शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत डीजेचा आवाज एकदम मर्यादित होता. मात्र, शनिवारी सकाळपासूनच डीजेचा दणदणाट ऐकायला मिळाला. मध्यवर्ती बेलबाग चौक, केळकर रस्ता, कुमठेकर मार्ग, टिळक रोड परिसरातून अलका टॉकीजकडे येणार्या बहुतांश मंडळाकडून जोरजोरात डीजे वादन करण्यात आले. त्यामुळे बापटांच्या आंदोलनाचा संमिश्र प्रतिसाद झाल्याचे दिसून आले.
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक लांबली – सविस्तर बातमी
सण-उत्सवात ध्वनी प्रदुषण (Pune DJ Noise Pollution) होणार नाही, त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. अशी भूमिका घेत विद्यानंद बापट यांनी ध्वनी प्रदूषण विरुद्ध शड्डू ठोकला होता. महापालिकेत आयोजित बैठकीपासूनच त्यांनी ध्वनी प्रदुषण थोपवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला प्रचंड विरोध झाला. एकाने त्यांच्यावर हल्ला करीत मारहाण केली होती. दरम्यान, गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत शुक्रवारी दि. २५ दुपारपासूनच डीजेचा आवाज मर्यादित होता. चार बेस चार टॉप मर्यादेचे पालन बहुतांश मंडळांकडून करण्यात आले होते. त्यादृष्टीने आवाजही कमी ठेवला होता. रात्रीच्या सुमारास केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरात काही मंडळांनी नियमांचे उल्लंघन केले. डीजेसह लेझरमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले.
मिरवणूक संपेपर्यंत डीजेचा दणदणाट
विसर्जन मिरवणूकीच्या दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजेपासूनच डीजे वादकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. बहुतांश मंडळांकडील डीजे वादन (Pune DJ Noise Pollution) मर्यादेपेक्षा मोठ्या डेसीबल आवाजात असल्याचे खासगी संस्थेने केलेल्या नोंदीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सकाळी सहा ते संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत १२ तास डीजे वादकांचा दणदणाट असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध काय कारवाई होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.




















