Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Ganesh Visarjan Security : मिरवणुकीची वेळ नव्हे, सुरक्षेला प्राधान्य दिले – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Ganesh Visarjan Security : मिरवणुकीची वेळ नव्हे, सुरक्षेला प्राधान्य दिले - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गर्दी, वाहतूक आणि महिला सुरक्षेसाठी पोलिसांचे नियोजन

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जन मिरवणूक किती तास चालली, हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय नाही. गर्दी असताना नागरिकांची गैरसोय होऊ न देता उत्सव सुरक्षितपणे पार पडला, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मिरवणुकीदरम्यान गर्दीचे नियोजन, महिला सुरक्षा, (Pune Ganesh Visarjan Security) वाहतूक व्यवस्थापन आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करण्यात आला. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी दिली.

पुण्यात रात्री कमी आवाज तर सकाळी दणदणाट – सविस्तर बातमी 

विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा गणपती शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता टिळक (अलका) चौकातून पुढे गेल्यानंतर अमितेशकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त मनोज पाटील, संजय बन्सोडे, तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते. गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि पुणेकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

Pune Ganesh Visarjan Security अमितेश कुमार म्हणाले, ‘‘मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र, गर्दीच्या परिस्थितीत एखादे गणेश मंडळ घाईने पुढे काढण्याचा प्रयत्न केल्यास चेंगरा चेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यापेक्षा गर्दीचे सुरक्षित व्यवस्थापन आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.’’

सुरुवातीला मानाचे गणपती मिरवणुकीत दाखल झाले. त्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे मिरवणुकीच्या पुढील प्रवाहावर त्याचा परिणाम झाला आणि काही प्रमाणात विलंब झाला. शहरातील अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अशा परिस्थितीत सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पोलिसांनी निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दीचे (Pune Ganesh Visarjan Security) नियोजन करण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या. मेट्रो सेवेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे सहा लाख नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. गर्दी मोठी असतानाही वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींचे नियोजन करण्यात आल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका अडकू नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. गर्दीच्या परिस्थितीत तब्बल ३४ रुग्णवाहिका गर्दीतून मार्गस्थ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ध्वनिमर्यादेचे अधिक पालन

यंदा मागील वर्षाच्या तुलनेत ध्वनिमर्यादेचे अधिक पालन झाल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी डेसिबल तपासणीचा प्रयत्न करण्यात आला आहे. २४ सप्टेंबरपर्यंत ध्वनिप्रदूषणासंदर्भात २१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, विसर्जनाच्या काळातील नियम भंगावरही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बापट यांच्या नाराजीची दखल घेणार

Pune Ganesh Visarjan Security : काही गणेश मंडळांनी विद्यानंद बापट यांचा एआय आधारित व्हिडिओ डीजेच्या पडद्यावर लावला होता. त्याबाबत बापट यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात अमितेशकुमार म्हणाले, ‘‘बापट यांच्या नाराजीची माहिती घेण्यात येईल. त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल.’’

विसर्जन मिरवणुकीमुळे काही सामान्य नागरिकांना त्रास झाला असेल, तर त्याबद्दल खेद व्यक्त करतो,’’ असेही अमितेशकुमार यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा वापर गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, महिला सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर केला. गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक नियोजन करण्यात आले. तांत्रिक साधनांच्या मदतीने उत्सव सुरक्षितपणे पार पाडण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

अमितेशकुमार म्हणाले…

शेवटचा गणपती सायंकाळी सव्वासहा वाजता अलका चौकातून गेला.

शुक्रवारी सुमारे सहा लाख नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला.

गर्दीतून ३४ रुग्णवाहिका मार्गस्थ करण्यात आल्या.

मिरवणुकीच्या कालावधीपेक्षा नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ध्वनिमर्यादेचे अधिक पालन.

२४ सप्टेंबरपर्यंत ध्वनिप्रदूषणासंदर्भात २१ गुन्हे दाखल.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×