Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

बिल कमी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर डॉक्टरानेच रोखले पिस्तूल

हडपसरमधील घरफोडीचा पोलिसांनी लावला छडा

हडपसरच्या पूनावाला हॉस्पिटलमधील प्रकार

marathinews24.com

पुणे – मित्राच आईचे निधन झाल्‍यानंतर रुग्णालयातील बिल कमी करण्याच्या मागणीसाठी गेलेल्या समाजसेवकावर चक्क रुग्णालयाच्या डॉक्‍टर असलेल्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पिस्तूल रोखल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील विलु पूनावाला हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बिल कमी करण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या छातीला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात डॉ. आर्या लजपतराय (वय ५८, सीओओ, विलु पूनावाला हॉस्पिटल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रतीक उत्तम कांबळे (वय ३३, रा. कॅम्प, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

सायबर चोरट्यांकडून सव्वादोन कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक कांबळे यांच्या मित्राच्या आईवर विलु पूनावाला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर हॉस्पिटलचे बिल कमी करण्यात यावे, या मागणीसाठी प्रतीक कांबळे हे १६ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील डॉ. आर्या लजपतराय यांच्या केबिनमध्ये गेले होते. बिल कमी करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच वाद निर्माण झाला. यावेळी डॉ. आर्या यांनी बिलामध्ये कोणतीही कपात करणार नसल्याचे सांगत प्रतीक यांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि डॉक्टरांनी आपल्या जवळील पिस्तूल बाहेर काढून थेट प्रतीक कांबळे यांच्या छातीला लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी वरिष्ठ डॉक्टरानेच शस्त्र रोखल्याच्या घटनेने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णालयाची पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी डॉ. आर्या लजपतराय यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३), ३५२ तसेच शस्त्र अधिनियम कलम ३० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पिस्तूल परवाना, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींचे जबाब याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×