Breking News
Pune Metro Traffic Changes : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदलBaner Robbery Case Pune : बाणेर परिसरात लूटमार करणारे गजाआडPune Illegal Pistol Seizure: सिंहगड रस्ता पोलिसांकडून सराइतांना बेड्या; पिस्तूल जप्तPune Lokmanya Festival : पुणे लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने ३० फुटांच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन; अनिष्ट प्रवृत्तींच्या अंताचा संदेशPune Bibwewadi Robbery Case : तरुणाला मारहाण करुन लुटणारे गजाआडPune Senior Citizen Pension Fraud : ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूकPune Post Office Theft Attempt : रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्नPune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Pune Illegal Pistol Seizure: सिंहगड रस्ता पोलिसांकडून सराइतांना बेड्या; पिस्तूल जप्त

Pune Illegal Pistol Seizure

सिंहगड रस्ता पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Illegal Pistol Seizure : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. सूर्यराज मनोज निंबाळकर (वय २०, रा. श्री गजानन सोसायटी, गोकुळनगर, नऱ्हे), गौरव राजू घाडगे (वय २०, रा. शांती प्रेस्टीज सोसायटी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. निंबाळकर आणि घाडगे यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

तरुणाला मारहाण करुन लुटणारे गजाआड – सविस्तर बातमी 

सिंहगड रस्ता परिसरात पोलीस कर्मचारी विनायक मोहिते, राहुल ओलेकर हे गस्त घालत होते. एकतानगरी परिसात दोघे जण थांबले होते. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. सापळा लावून पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. दोघांनी पिस्तूल का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक समीर गायकवाड, उपनिरीक्षक भूपेश साळुंके, उत्तम तारु, अण्णा केकाण, प्रफुल्ल चव्हाण, सतीश मोरे, विकास बांदल यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×