Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

Pune loan fraud : २०० कोटींच्या कर्जाचे आमिष; कंपनीला ९० लाखांचा गंडा

Medicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूक

७ जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा

marathinews24.com

पुणे – विविध वित्तीय संस्थांकडून तब्बल २०० कोटी रुपयांचे कर्ज  (Pune loan fraud) मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत कंपनीला तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विमाननगर येथील नामांकित नोवोटेल हॉटेलसह शहरातील विविध ठिकाणी बैठका घेऊन फसवणुकीचा कट रचण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ए. राजा मोहम्मद (वय ४९, रा. मदुराई, तामिळनाडू) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निशांत अरोरा, राजेंद्र कुमार बैद, किरण, सत्यावेलन, मनोज कुमार चौधरी, सोहम आणि शोभित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील निरीक्षणगृहात नेण्याआधीच ‘पलायन’ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसांत संगनमत करून ‘ऑरेंज रिटेल फायनान्स प्रा. लि.’ या कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. विविध वित्तीय संस्थांकडून कंपनीला २०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याची क्षमता असल्याचे सांगत आरोपींनी कंपनीचा विश्वास संपादन केला. कर्ज मंजुरीसाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे आणि विविध शुल्कांच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादींकडून वेळोवेळी पैसे घेतले. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत विश्वासाचे वातावरण निर्माण केले. यामध्ये विमाननगर येथील नोवोटेल हॉटेलमध्येही बैठक झाल्याचे समोर आले आहे. कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी कंपनीकडून तब्बल ९० लाख रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर कोणतेही कर्ज मंजूर करून दिले नाही. तसेच घेतलेली रक्कमही परत न करता आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजा मोहम्मद यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×