Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune News : पुण्यात ९ जणांची न्यायालयाकडून दोषमुक्‍ती !

Pune News

व्यसनाच्या विळख्यातील १२ जणांना पोलिसांनी दिली नवी संधी

marathinews24.com

पुणे – Pune News : अमली पदार्थांच्या तस्करांवर कठोर कारवाईचा बडगा उगारतानाच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्यांना पुनर्वसनाची संधी देण्याचा संवेदनशील उपक्रम पुणे पोलिसांनी राबविला आहे. परिमंडळ तीन अंतर्गत वारजे, नऱ्हे, उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलिसांनी १२ व्यसनाधीन व्यक्तींना किरकटवाडी येथील आत्मनिर्भर सोशल फाउंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठविले. या सर्वांनी एक महिन्याचा उपचार पूर्ण केला असून, त्यापैकी नऊ जणांना न्यायालयाकडून दोषमुक्‍ती (डिस्चार्ज) मिळाला आहे. उर्वरित तिघांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; कोंढव्यात पोलिसांचा छापा – सविस्तर बातमी 

अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना केवळ गुन्हेगारीच्या चौकटीत न पाहता, त्यांना व्यसनातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर या मोहिमेत भर देण्यात आला. उपचार पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया राबवून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आले. उत्तमनगर, नांदेड सिटीमध्ये तिन्ही प्रकरणांचा निकाल वारजे पोलिसांनी उपचारासाठी पाठविलेल्या तीन व्यक्तींपैकी एकाला न्यायालयाकडून डिस्चार्ज मिळाला असून, दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. नऱ्हे पोलिसांच्या तीन प्रकरणांपैकी दोघांना दिलासा मिळाला असून, एक प्रकरण प्रलंबित आहे. उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलिसांनी प्रत्येकी तीन व्यक्तींना उपचारासाठी पाठविले होते. या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व सहा प्रकरणांत संबंधित व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला आहे.

कलम ६४(अ)चा आधार

Pune News अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ६४(अ) अंतर्गत पात्र ठरणाऱ्या व्यक्तींना कायद्यातील अटींच्या अधीन राहून व्यसनमुक्ती उपचार घेतल्यास अभियोजनापासून (एखाद्या व्यक्तीला विशिष्ट कायदेशीर तरतुदींनुसार त्या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला चालविण्यापासून संरक्षण मिळणे) संरक्षण मिळू शकते. या तरतुदीचा वापर करून व्यसनाधीन व्यक्तींना उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

अमली पदार्थ विक्रेत्यांसाठी कठोर कायदा आणि व्यसनाधीन व्यक्तींसाठी उपचार व पुनर्वसनाची संधी, हीच पोलिसांची भूमिका आहे. अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसनदेखील तितकेच आवश्यक आहे.” अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीवर कठोर कारवाई करण्याबरोबरच व्यसनाधीन व्यक्तींना उपचारांच्या माध्यमातून नव्याने उभे राहण्याची संधी देण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा ठरत आहे.

डॉ. सागर कवडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×