सय्यदनगर परिसरातील अन्सारी गॅरेजसमोर उभी केलेली रिक्षा चोरीला
marathinews24.com
पुणे – Pune Rickshaw Theft : हडपसर येथील सय्यदनगर परिसरातून ७० हजार रुपये किमतीची रिक्षा अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुक्तार घुडन कोतवाल (रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
सुकामेव्याच्या दुकानाचे कुलूप तोडून ६ लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत अन्सारी गॅरेजसमोर उभी असलेली रिक्षा चोरीला गेली. रिक्षा लॉक करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Pune Rickshaw Theft) रिक्षेची किंमत ७० हजार रुपये आहे.
हत्याराचा धाक दाखवून १५ हजारांची मागणी
नांदेड गावातील गॅरेज व्यावसायिकाला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून १५ हजार रुपये आणि दरमहा पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास धमकी दिल्याची फिर्याद आहे. याप्रकरणी बंड्या गायकवाड नावाच्या एकावर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनू दिलीप कंजाड (रा. नांदेडगाव परिसर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेचार ते सायंकाळी सात या वेळेत कोरेगावबाग येथील रॉयल व्हीलर सर्व्हिसिंग सेंटरमध्ये हा प्रकार घडला. आरोपीने फोन करून भेट घेतली आणि लोखंडी हत्याराचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.




















