Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Traffic News : छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर जड वाहनांना बंदी

Pune Traffic News

लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी

marathinews24.com

पुणे – Pune Traffic News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातील दोन दिवस (शनिवार आणि रविवार) पुणे शहरात जड वाहनांच्या वाहतुकीसाठी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता परिसरात खरेदीसाठी गर्दी सुरू झाली असून, शनिवार आणि रविवारी देण्यात आलेली जड वाहनांना परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. दिवाळी संपेपर्यंत मध्य भागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

सुरक्षित दिवाळीसाठी पुणेकरांवर अग्निसुरक्षेची जबबादारी – सविस्तर बातमी 

‘शहरातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्राशी संबंधित वाहने, मालवाहू वाहनांना शनिवारी आणि रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त मध्य भागात खरेदीसाठी सुरू झाली आहे. (Pune Traffic News) शनिवारी आणि रविवारी मध्य भागात जड वाहनांच्या वाहतुकीस देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. जड वाहनांना मध्य भागातील प्रमुख रस्त्यांचा वापर करू नये’, असे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले आहे.

‘दिवाळीनिमित्त लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, तसेच महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसरात पुणे शहर, उपनगर, तसेच जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. शनिवारी आणि रविवारी मध्य भागात खरेदीसाठी गर्दी होती. पादचाऱ्यांची सुरक्षा, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मध्य भागात शनिवारी, रविवारी जड वाहनांना देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. दिवाळी संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत’, असे पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×