गुुन्हे शाखेच्या युनीट सहाने केली अटक
marathinews24.com
पुणे – दुचाकी चोरट्यांना अटक, दोन गुन्हे उघडकीस – दुचाकींची चोरी करणार्या दोघा चोरट्यांना गुुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केली आहे. त्यांच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून वाहन जप्ती केली आहे. दीपक राजेंद्र बीडगर (वय २३ रा. न्हावरा, शिरूर) आणि मच्छिंद्र दिगंबर खैरनार (वय ४१ रा. रांजणगाव, पुणे ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी चोरट्यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
झटपट श्रीमंत होण्याचे आमिष पडले १५ लाखांना – सविस्तर बातमी
वाहनचोरी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी युनीट सहाचे पथक एपीआय राकेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार सचिन पवार यांना पेरणे फाटा परिसरात एकजण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दीपक बीडगर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शिक्रापूर परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
युनीट सहाचे पथक वाघोली परिसरात पेट्रोलिंग करीत असताना भावडी रोड परिसरात आरोपी मच्छिंद्र खैरनार हा संशयास्पद फिरताना पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने म्हाळुंगे परिसरातून दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली. त्याला संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीसी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, एपीआय राकेश कदम, एपीआय मदन कांबळे, बाळासाहेब सकट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.