Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Rana Suryavanshi Attack Case : जबाबविना पोलीस पथक परतले? उद्योजक राणा सूर्यवंशी यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज

Rana Suryawanshi Security

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सूर्यवंशी यांना डिस्चार्ज मिळाल्याची सूत्रांची माहिती

marathinews24.com

पुणे – Rana Suryavanshi Attack Case : उद्योजक आणि राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दरदिवशी नवनवीन वळण मिळत आहे. त्यांना संपवण्यासाठी जवळच्या मित्रांनीच मारेकऱ्यांना सुपारी दिली असल्याले बोलले जात आहे. त्यानंतर आता बारामती तालुका पोलीस त्यांचा जबाब नोंद करण्याच्या तयारीत होते. पोलीस पथक पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल झाले. प्रत्यक्षात मात्र, राणा हे त्याठिकाणी नव्हते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जबाब नोंद करण्यासाठी आलेले पोलीस पथक रिकाम्या हाती परतले. जखमी राणा हे कोठे गेले, ते पसार झाले आहे का, त्यांनी पोलिसांकडे जबाब नोंदविण्यासाठी वेळ घेतला आहे का, या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही.

अल्पवयीनावर लोखंडी हत्याराने वार; दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा – सविस्तर बातमी 

राणा दिलीप सूर्यवंशी (वय ४१ रा. मगरपट्टा, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. याप्रकरणी पार्थ वासुदेव अवस्थळे (वय १९ रा. पिंपरी गवरी, खामगाव, बुलढाणा, सध्या- कर्वेनगर, पुणे) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. वीट, करमाळा, सोलापूर, सध्या थोरातनगर, भिगवण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांना २ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार १८ ऑक्टोबरला रात्री सातच्या सुमारास ते कटफल जवळ असलेल्या ठिकाणी दुचाकीस्वार दोघांनी कोयत्याने वार करून जखमी केले. हल्ल्यात जखमी राणा यांना सुरुवातीला बारामतीच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज नुसार त्यांच्या आणखी ३ मित्रांचा हल्ल्यात सहभाग असल्याची चर्चा आहे.

हल्ला प्रकरणात नवनवीन कंगोरे समोर येत असताना पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्न झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हल्ल्याच्या घटनेमागील नेमके कारण, त्यातील संशयास्पद बाबी आणि हल्ल्याच्या बनावाच्या चर्चेमागील तथ्य याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. (Rana Suryavanshi Attack Case) पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे. तपासातील प्रगती आणि प्रकरणाने घेतलेले वळण याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय सुरू आहे आणि पोलिसांकडून माहिती का दिली जात नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच सूर्यवंशी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे. हल्ल्याच्या घटनेमागील सत्य काय, बनावाच्या चर्चेत तथ्य आहे का आणि तपासातून कोणती माहिती समोर येणार, हे ग्रामीण पोलिसांच्या पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×