उत्तमनगरमधील पुष्पा रेसिडेन्सीजवळ १६ वर्षीय मुलावर हल्ला
marathinews24.com
पुणे – Uttamnagar Attempted Murder : उत्तमनगर परिसरात १६ वर्षीय मुलावर लोखंडी हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांसह एका अनोळखी साथीदाराविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुशांत विलास वाल्मिकी (वय ३२, रा. भवानीमाता कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) आणि सचिन राजू मारणे (वय २६, रा. एनडीए चौकीमागे, उत्तमनगर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरव वाल्मिकी (वय १६, रा. भिकोबा इस्कॉन मंदिराजवळ, उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वाहन चालकाला मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास पुष्पा रेसिडेन्सी, उत्तमनगर (Uttamnagar Attempted Murder) येथे मित्रांसोबत गप्पा सुरू असताना आरोपींनी जुन्या रागातून वाद घातला. लोखंडी हत्याराने डोक्यावर आणि पोटावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मार्केटयार्डमध्ये दुकान फोडून चांदीचे शिक्के, रोकड चोरीला
मार्केटयार्डमधील दुकानाचे शटर आणि लोखंडी खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी चांदीचा शिक्का व रोकड असा सुमारे सहा लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रात्रीच्या वेळी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम विनोद जैन (वय २७, रा. ओशियन डेल्फिनो सोसायटी, महावीर प्रतिष्ठान स्कूलजवळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा या कालावधीत भुसार मार्केटमधील राजस्थान पेठीजवळील दुकानात चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर कशाने तरी तोडून आत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर जाऊन शेजारील दुकानांची लोखंडी खिडकीची ग्रील तोडली. त्यानंतर एका चांदीच्या शिक्क्यासह रोकड लंपास केली.




















