Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

रिक्षा चालकाला हप्ता मागणारा सराइत गजाआड

रिक्षा चालकाला हप्ता मागणारा सराइत गजाआड

नांदेड सिटी पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – रिक्षा चालकाला धमकावून दरमहा दोन हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या सराइताला नांदेड सिटी पोलिसांनी गजाआड केले.
सागर चरेकर (वय ३५, रा. जाधवनगर, रायकर मळा, धायरी) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. या प्रकरणी चरेकरसह दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.याबाबत रिक्षाचालक सुनील निळकंठ सुबाने (वय ३०, रा. शांतीबन सोसायटी, रायकरमळा, धायरी) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला, कात्रजमधील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक सुबाने हे धायरीतील जाधवनगर परिसरातील थांब्यावर १४ सप्टेंबर रोजी रात्री थांबले होते. त्यावेळी चरेकर आणि साथीदार तेथे आले. या भागात रिक्षा चालवायची असेल, तर दरमहा दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी रिक्षाचालक सुबाने यांना दिली. रायकर मळा भागात पुन्हा आल्यास जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. सुबाने यांनी घाबरून त्यांना शंभर रुपये देऊ केले. तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण करुन खिशातील ५०० रुपये काढून घेतले.

या घटनेनंतर सुबाने घाबरले होते. त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पाेलिसांनी चरेकर याला अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. चरेकरविरुद्ध मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. रिक्षाचालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली, असे नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×