अज्ञात चोरट्यांविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. ही घटना २० सप्टेंबरला सकाळी पावणे अकराच्या सुमारास अंजनीनगर कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी कात्रज परिसरात राहणार्या ३१ वर्षीय महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराचा दरवाजा उघडा असल्याची साधली संधी; नर्हे, खराडीत केली घरफोडी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज परिसरात राहायला असून, २० सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास अंजनीनगर कात्रज परिसरातून पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. काही वेळानंतर महिलेला गळ्यात मंगळसूत्र दिसून आले नाही. त्यानंतर तिने आंबेगाव पोलसी ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार निलेश जमदाडे तपास करीत आहेत.



















