घरफोडी करणार्यांना बाणेर पोलिसांकडून अटक
marathinews24.com
पुणे – दुकानाचे शटर उचकटून रोकडसह सोन्या-चांदीच ऐवज चोरी करणार्या सराईत टोळीला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाइल, दुचाकी, पालघन, रोकड असा ऐवज जप्त केला आहे. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी तब्बल २२५ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना ताब्यात घेतले. शिवम दत्ता अवचार( वय १९ रा. कामठे कॉलनी, अभिनव कॉलेज, नर्हे ) करण शिवाजी जमादार (वय १९ रा. सिंहगड कॉलेज जवळ वडगांव बुद्रूक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हातावर गोंदलेल्या नावावून आरोपीला अटक – सविस्तर बातमी
बाणेरमधील चितळे बंधूसह काका हलवाई दुकानाचे शटर उचकटून चोरीची घटना १६ एप्रिलला झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, रामटेकडी, आळंदी, नर्हे, आंबेगाव परिसरातील तब्बल २२५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी हे सराईत असून, त्यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न तसेच चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अस्तित्व लपवुन वेळोवेळी ते राहण्याचे ठिकाण बदलत होते. मात्र, पोलिसांनी कौशल्याने दोघांना ताब्यात घेत ऐवज जप्त केला.
आरोपींनी अल्पवयीनाच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दुचाकी, आयफोन, पालघन, १२ हजारांची रोकड असा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त चिलूमुला रजनीकांत, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, शरद राऊत, गजानन अवातिरक, स्वप्निल मराठे, गणेश भोईने, समीर पवार यांनी केली आहे.






















