सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची ९० हजार रुपयांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – गॅसपुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन ज्येष्ठाची फसणूक – गॅसपुरवाठा खंडीत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हाॅटलमधील सूपमध्ये झुरळ सापडले – मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गु्न्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. एमएनजीएलकडून केल्या जाणाऱ्या गॅस पुरवठ्याचे देयक थकीत आहे. देयक न भरल्यास गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी चोरट्याने केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना एक एपीके फाईल पाठविली. ही फाइल ज्येष्ठाने उघडतात त्यांचा मोबाइल क्रमांक जोडलेल्या बँक खात्याची माहिती चोरट्यापर्यंत पाेहोचली. चोरट्याने बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर केला. त्यांच्या बँक खात्यातून ९२ हजार रुपये लांबविले. पोलीस उपनिरीक्षक लोंढे तपास करत आहेत.
कर्वेनगर भागातील बंगल्यात चंदन चोरी
कर्वेनगर भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चाेरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांचा कर्वेनगर भागातील नटराज सोसायटीत बंगला आहे. गुरुवारी (१० जुलै) मध्यरात्री बंगल्यातील सीमाभिंतीवरुन उडी मारुन चोरटे आत शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारात असलेल्या चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत. शहर,परिसरातील बंगले, सोसायटीचे आवार, तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रभात रस्ता, स्वारगेटमधील मुकुंदननगर परिसरात चंदन चोरीच्या घटना घडल्या होत्या.