पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

कोथरूडमध्ये टोळक्याचा राडा, पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ७५ हजार रूपयांची सोन्याची बांगडी कापून नेली आहे. ही घटना १९ जुलैला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेजवळ घडली आहे. याप्रकरणी कोथरूड परिसरात राहणार्‍या ६२ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएमधून पैसे काढणार्‍या महिलेची ६५ हजार रुपयांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला कोथरूडमध्ये राहायला असून, १९ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास पीएमपीएल बसमधून प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्येच चोरट्यांनी महिलेच्या हातातीत ७५ हजार रूपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली. महिलेला बांगडी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार तोरडमल तपास करीत आहेत.

दोन ठिकाणी रोहित्राची चोरी, दीड लाखांची कॉपर चोरीला

विद्युत रोहित्र खाली पाडून चोरट्यांनी त्यातील दीड लाख रूपये किंमतीची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना २ ते ३ ऑगस्टला लोणी काळभोरमधील तरडे जवळी, थेउर-नायगाव रोड धुमाळ मळा परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी म्हातोबाची आळंदी परिसरात राहणार्‍या तरूणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे म्हातोबाची आळंदी परिसरात राहायला असून, २ ते ३ ऑगस्टला चोरट्यांनी त्यांच्या जमिनीवर असलेले विद्युत रोहित्र खाली पाडून, त्यातील कॉपरची वायर चोरून नेली आहे. त्यानंतर चोरट्यांनी थेउर-नायगाव रोड धुमाळ मळा परिसरातील रोहित्र फोडून कॉपरची वायर चोरी केली आहे. दोन्ही घटनेत चोरट्यांनी दीड लाखांची कॉपर वायर चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार विलास शिंदे तपास करीत आहेत.

शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

पुणे – शहरातील बाणेर परिसरासह कोंढवा भागात झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. याप्रकरणी बाणेर आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अपघात करणार्‍या वाहन चालकांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या वाहनाचा क्रमांक शोधून कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहन चालकाने दिलेल्या धडकेत गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात २३ सप्टेंबर २०२४ मध्ये बाणेरमधील राधा चौकाजवळ घडला होता. मुकेश श्यामबदन चौहान (वय २१ रा. किर्ती गार्डनजवळ, सुस रोड, मुळशी ) असे उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महेश थिटे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात मोटार चालकाने वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत पादचारी मुकेशला धडक दिली होती. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे मुकेशवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदेश माने तपास करीत आहेत.

कोंढव्यात दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

भरधाव दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १ ऑगस्टला रात्री साडेबाराच्या सुमारास कोंढव्यातील सोमाजी चौकात घडली आहे. समीर ऐजाज शेख (वय ४८ रा. जे. के. पार्क, कोंढवा खुर्द) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×