Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

एटीएमधून पैसे काढणार्‍या महिलेची ६५ हजार रुपयांची फसवणूक

एटीएमधून पैसे काढणार्‍या महिलेची ६५ हजार रुपयांची फसवणूक

पर्वती भागातील घटना

marathinews24.com

पुणे – एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेकडे मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने ६५ हजारांची रोकड लांबविल्याची घटना पर्वती भागात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सराइताकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पर्वतीतील लक्ष्मीनगर परिसरात राहायला आहेत. पर्वती गावातील बँकेतील एटीएमधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एटीएमच्या परिसरात चोरटा थांबला होता. महिलेने एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर चोरटा तेथे आला. चोरट्याने महिलेला मदत करण्याचा बहाणा केला. महिलेकडील डेबिट कार्ड चोरट्याने घेउन त्यांना सांकेतिक शब्दाचा वापर करण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्याने एटीएममधून पैसे बाहेर येत नाही, अशी बतावणी केली. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्याने त्याच्याकडील डेबिट कार्ड महिलेला दिले. एटीएममध्ये मदत करण्याच्या आमिषाने अनोळखी व्यक्तीने ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पर्वती परिसरात उघडकीस आली.

महिलेच्या डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन चोरट्याने खात्यातून ६५ हजार रुपये लांबविले. खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. स्वारगेट पोलिसंनी घटनास्थळी भेट दिली. एटीएमच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून एटीएममधून पैसे काढणार्‍या नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. खडकी बाजार, वारजे, सोमवार पेठ परिसरात एटीएमधून पैसे काढणार्‍या नागरिकांची चोरट्याची फसवणूक केली होती. वारजे आणि समर्थ पोलिसांनी फसवणूक प्रकरणात उत्तर प्रदेशातील चोरट्यांच्या टोळीला अटक केली होती. बतावणी करणार्‍या चोरट्यांपासून सावध राहण्याचो आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×