Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

“कला हवी, अश्लीलता नको; आता आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष आदेश हवा!”

marathinews24.com

पुणे – डीजे डान्स आणि डीजे लावणीच्या नावाखाली महाराष्ट्राच्या संस्कृतीची विटंबना करणारे अशोभनीय कार्यक्रम तातडीने बंद करावेत, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले तसेच अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी केली.

फ्लॅटचे कुलूप तोडून ९ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी

काही कार्यक्रमांमध्ये अशोभनीय अंगविक्षेप, पैशांची उधळण, प्रेक्षकांना स्टेजवर बोलावणे तसेच महिला कलाकारांना लज्जास्पद वाटतील असे सादरीकरण होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणे हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. प्रशासनाने याकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता महिला व बालसुरक्षा तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले ,अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे ,सर्वात्मक महारुद्र ट्रस्ट व राष्ट्रीय महाकाल सेना पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ शिंदे ,
मनसे पुणे शहर सचिव सोनाली पोकळे, दिशा फाउंडेशनच्या अर्चना चंदनशिवे,मराठी रंगभूमी निर्माता महासंघ व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सह कलाकार पूनम डांगे, स्वाती महाडिक, नंदिनी पूणेकर, अजिंक्य झाबरे, कुणाल वैद्य, राधिका औताडे, वृषाली सातपुते, आरोही पाटील, सपना कवडे, चंद्रकांत पवार,उमेश मुळशीकर, भारती मोरे ह्यांची ही ठाम मागणी आहे की डीजे डान्स कार्यक्रमावर बंदी झाली पाहिजे.

“लावणी ही महाराष्ट्राची समृद्ध आणि अभिमानास्पद लोककला आहे. मात्र लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य व अशोभनीय सादरीकरण करून या कलेची बदनामी करणाऱ्यांना थारा देता कामा नये. पारंपरिक आणि गुणवंत लावणी कलाकारांना सन्मान, योग्य व्यासपीठ, काम आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. शासनाने अशा कार्यक्रमांवर प्रभावी नियंत्रण ठेवतानाच अस्सल लावणी, लोककला आणि लोककलाकारांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” असे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.

“लावणीमध्ये अभिनय, नृत्य, भावभावना आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुंदर संगम आहे. मात्र लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव आणि अशोभनीय सादरीकरण करून या समृद्ध कलेला बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही स्वतः कलाकार आहोत आणि कलेचा सन्मान राखणे ही आमची जबाबदारी आहे. गुणवंत आणि पारंपरिक लावणी कलाकारांना योग्य व्यासपीठ, सन्मान व संधी मिळाली पाहिजे; अश्लीलतेला कोणतेही स्थान मिळता कामा नये,” असे अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी स्पष्ट केले.

“अश्लील कार्यक्रम करायचे आणि त्याला पुणेकरांची ओळख जोडायची, हे अजिबात चालणार नाही. पुणेकर हे नाव शिक्षण, संस्कृती, प्रबोधन आणि विचारांची ओळख आहे. या नावाला बदनाम करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्यांची जी अधिकृत ओळख आहे, त्यांनी आपले खरे नाव-आडनाव वापरावे. पुणेकरांच्या नावाच्या आडून अश्लीलतेचा बाजार मांडू देणार नाही. पुण्याची संस्कृती आणि पुणेकरांचा स्वाभिमान जपण्यासाठी अशा प्रकारांविरोधात ठामपणे आवाज उठवला जाईल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

लावणी, भारूड, पोवाडा, लोकनृत्य आणि लोकसंगीत यांसारख्या पारंपरिक लोककलांना योग्य व्यासपीठ, काम, मानधन व सन्मान मिळत नसताना अशोभनीय कार्यक्रमांना मोठी बाजारपेठ मिळणे ही गंभीर विसंगती आहे. त्यामुळे लावणी व डीजे डान्स कार्यक्रमांसाठी स्वतंत्र नियमन यंत्रणा निर्माण करून स्पष्ट आणि कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली.

याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती अण्णा दादू बनसोडे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदने सादर करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून चौकशी व सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मिळाले असले तरी, “आता आश्वासन नको, प्रत्यक्ष आदेश आणि कारवाई हवी,” असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.

ही भूमिका कोणत्याही कलाकार, संगीत किंवा डीजे साऊंडच्या विरोधात नसून अश्लीलता, महिला कलाकारांचे वस्तुकरण, कलाकारांचे शोषण आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांविरोधात आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा सन्मान राखत पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन आणि अशोभनीय कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×