Breking News
राज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडे

पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेला तस्कर जेरबंद

साडेचार किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील शिवाजीनगर रेल्वे परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तस्कराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून साडेचार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. राहुल सदाशिव कांबळे (वय २८ रा. शेलारवाडी स्टेशन, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे.

सराईत मोबाइल चोरट्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या – सविस्तर बातमी 

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस नाईक सचिन जाधव आणि पोलिस अंमलदार श्रीकांत मखरे यांना शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील झाडाझुडपांच्या परिसरात गांजा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने सापळा रचला अन राहुल कांबळे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. चौकशीत तो हा गांजा हैदर इराणी याच्‍या सांगण्यावरून हा गांजा विक्रीसाठी आणल्‍याचे सांगितले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली अमंलदार महावीर बलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, दिपक रांभाडे, श्रीकृष्ण सांगवे यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×