Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे स्टेशन परिसरात दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी रोखली

‘डीआरआय’ची कारवाई; तीन शेकरू, सात कासवे जप्त

marathinews24.com

पुणे – भीमाशंकर परिसरातील दुर्मिळ शेकरुंची तस्करी करण्याचा प्रकार महसूल गुप्तचर संचलनालयाने (डिरोक्टरेट रेव्हेन्यू इंटेलिजन्स, पुणे कार्यालय)उघडकीस आणली. याप्रकरणी ‘डीआरआय’च्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून खोक्यात लपवलेले तीन शेकरु, तसेच सात कासवे ताब्यात घेण्यात आली आहेत.

कारवाईची भीती दाखवून संगणक अभियंता महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी

पुणे रेल्वे स्थानक परिसरात वन्यजीवांची तस्करी करणारे दोघे जण थांबल्याची माहिती ‘डीआरआय’च्या पुणे विभागाच्या पथकाला मिळाली. पथकाने स्टेशन परिसरात सापळा लावला. तेथे संशयास्पद फिरणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेणअयात आली. तेव्हा दोन पुठ्याच्या खोक्यात तीन शेकरू (मलबार जायंट स्क्विरल) आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या एकाची चौकशी करण्यात आली. तेव्हा एकाकडे ‘इंडियन स्टार टाॅर्टराईज’ प्रजातीची सात कासवे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ‘डीआरआय’च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात कासवे जप्त करण्यात आली. वन्यजीव कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली.

‘शेकरू आणि भारतीय स्टार कासव हे दोन्ही प्राणी वन्यजीव (संरक्षण) कायदा १९२ च्या अनुसुची – एक (शेड्युल्ड वन) अंतर्गत येतात. या प्राण्यांना कायद्यानुसनार संरक्षण मिळालेले आहे. त्यांची शिका करणे, बाळगणे, वाहतूक, तसेच विक्री करण्यास बंदी आहे. दोन्ही आरोपींना कायदेशीर कारवाई करण्यासाठी वन विभागाच्या कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. ‘वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध यापुढील काळत कडक कारवाई करण्यात येणार आहे’, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×