Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून 3 ऑक्टोबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – राज्यात १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, येरवडा, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

या कार्यक्रमास श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, पुणे विभाग, पुणे तसेच श्री. विशाल लोंढे, सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे उपस्थित राहणार आहेत. प्रादेशिक उपायुक्त व सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या सर्व संघ- संघटना या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान व गौरव करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय भवनामध्ये करण्यात आले आहे. असे विशाल लोंढे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×