Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

दारू पिण्यास पैसे न दिल्याने डोक्यात दगड घातला

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक जण अटकेत

marathinews24.com

पुणे – दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लाॅट परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुलीला नांदविण्यास न पाठविल्याने सासऱ्यावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू इककळकी बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास गुलटेकडीतील डायसप्लाॅट परिसरात थांबला होता. आरोपी राजू याचा ओळखीचा आहे. आरोपी प्रेम याने त्याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले हाेते. दारू पिण्यास पैसे न दिल्याने आरोपी त्याच्यावर चिडला होता. आरोपीने राजू याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घातला.

गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपीने त्याला दगडाने मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक शेळके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×