Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

विद्यार्थ्यांनी अनुभवली विमानशास्त्राची रोमांचक व अद्भुत सफर

विद्यार्थ्यांनी अनुभवली विमानशास्त्राची रोमांचक व अद्भुत सफर

एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे पाषाण येथे ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शन; उद्यापर्यंत खुले राहणार

marathinews24.com

पुणे – कागदी, लाकडी विमानाच्या प्रतिकृती, प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक जेटपर्यंतच्या विमानांचा इतिहास, त्यामागील शास्त्र समजून घेत विद्यार्थ्यांनी विमानशास्त्राची रोमांचक व अद्भुत सफर अनुभवली. विज्ञानाची ओढ, आकाशाच्या गूढतेची उत्सुकता मनात बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाषाण येथील एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे शाखेतर्फे शास्त्रवाहिनीच्या सहकार्याने आयोजित ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पाषाण येथील अरोमी लॉन्समध्ये आयोजित हे प्रदर्शन उद्या शनिवारपर्यंत (ता. २८) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

गायनाचा विश्वविक्रम करून ‘एक्सलन्स इंग्लंड’ पुरस्कार मिळवणाऱ्या 115 कलाकारांचा भव्य सत्कार संपन्न – सविस्तर बातमी 

या प्रदर्शनाचे उद्घाटन पाषाण येथील एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (एईएसआय) पुणे शाखेचे व्हाईस चेअरमन आणि आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे (एआरडीई) संचालक एम. व्ही. रमेश कुमार, पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी निलेश धनापुने, शास्त्रवाहिनीचे संस्थापक व एरोमॉडेलर माधव खरे, ‘एईएसआय’चे सचिव ए. आनंद राज, सहसचिव डॉ. एल. के. गीते आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात प्रवेश करताच उड्डाणाच्या सुरुवातीच्या संकल्पनांपासून ते आधुनिक जेट विमानांपर्यंतचा प्रवास जिवंतपणे उलगडतो. पक्ष्यांच्या उड्डाणातून प्रेरणा घेत मानवी बुद्धिमत्तेने कसा विकास साधला, याचे आकर्षक मॉडेल्स आणि माहितीफलकांद्वारे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना येथे केवळ पाहण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना उड्डाणामागील विज्ञान समजावून सांगणारे प्रात्यक्षिक प्रयोगही दाखवले जात आहेत. एरोडायनॅमिक्स, लिफ्ट, थ्रस्ट आणि ड्रॅग यांसारख्या संकल्पना सोप्या आणि रोचक पद्धतीने स्पष्ट केल्या जात असल्याने, विज्ञान शिकण्याची प्रक्रिया अधिक जिवंत आणि अनुभवाधारित ठरत आहे.

एम. व्ही. रमेश कुमार म्हणाले, “विमान तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये राइट बंधूंचा मोठा वाटा आहे. आपल्याला दिसणाऱ्या हायपरसोनिक वेगाने उड्डाण करणाऱ्या अत्याधुनिक विमानांच्या प्रगतीमागे मोठा इतिहास दडलेला आहे. आधुनिक विमाने ऑटोमेशन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. ऑटोपायलट प्रणालीमुळे विमानाचे संचालन सुरक्षित आणि अचूक झाले आहे. आज अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे मूलभूत धडे शिकवले जातात. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि अभ्यागतांना विमान तंत्रज्ञानाचा इतिहास, त्यामागील विज्ञान आणि आधुनिक प्रगती यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळते.”

माधव खरे म्हणाले, “विमानाच्या भूतकाळाचा सखोल आढावा घेणारे हे ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शन आहे. अत्याधुनिक विमानांचा, त्यातील तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची संधी आहे. देशातील विविध विद्यापीठांमधील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनीही यात उत्साहाने सहभाग घेतला असून, त्यांनी कागदी आणि लाकडी विमाने तयार करून त्यामागील तांत्रिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतल्या आहेत.”

निलेश धनापुने म्हणाले, “प्रदर्शनातून विमानांचा इतिहास प्रभावीपणे दाखवला आहे.कोणतेही तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून अधिक सखोल समजते. येथे विद्यार्थ्यांना, अभ्यागतांना विमाननिर्मितीमागील विज्ञान, तांत्रिक संकल्पना आणि प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची व समजून घेता येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होण्याकरिता पुढील वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांना अशा उपक्रमांत सामावून घेणार आहोत.”

अंजली कोलप यांनी सूत्रसंचालन केले. आनंद राज यांनी आभार मानले. डॉ. एल. के. गीते, राहुल चोपडे, सुनील हिवाळे, नितीका मित्तल, संगीता शर्मा, श्रुती राजपरा, मोहम्मद अलीम आदी सहकाऱ्यांनी प्रदर्शनाचे संयोजन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×