अज्ञात व्यक्तींवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Swargate Mobile Snatching : स्वारगेट मेट्रो स्थानकाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीच्या हातातील ७५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संग्राम व्यंकटराव शिंदे (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
हडपसरमधून रिक्षा चोरीला; गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेचार वाजता नेहरू स्टेडियम चौकीजवळील स्वारगेट (Swargate Mobile Snatching) मेट्रो स्थानकासमोर ही घटना घडली. फिर्यादी तेथे थांबलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि तेथून पळ काढला. चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पानमळ्यातून रिक्षा चोरीला
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरातून ५० हजार रुपये किमतीची रिक्षा अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुभाष माणिक जोंबाडे (रा. पानमळा परिसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत पानमळा येथील पंचघर दुकानासमोर, सार्वजनिक रस्त्याच्या कडेला ही रिक्षा उभी होती. या कालावधीत अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली. रिक्षेची किंमत ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.




















