स्पोर्टस बाईकवरून सोनसाखळी हिसकावणार्‍या सराईताला बेड्या ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस, रांजणगावसह एलसीबी पथकाची कामगिरी पुणे- पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावून नेणार्‍या अट्टल चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या रांजणगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून, तब्बल १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८ रा लिंबोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार शरद बापु पवार (रा लोणी सय्यदमीर ता आष्टी) पसार आहे. याप्रकरणी वंदना रोहिदास शेटे (वय ३३ रा. पिंपरी दुमाला ता शिरुर पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वंदना शेटे २५ मार्चला रांजणगाव गणपती चौकातील धनगरवाडा स्नॅक्स सेंटरमध्ये होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघाजणांनी पाण्याची बाटली खरेदीच्या बहाण्याने वंदनाला ५० रूपये दिले. त्यानंतर उर्वरित पैसे देत असताना आरोपींनी महिलेच्या गळ्यातील ११ गॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस करीत होते. घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करताना स्पोर्टबाईक वापरली होती. दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर, चाकण, आळंदीसह अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने गुन्हे झाले होते. परिसरातील मार्गावर १० दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीसांनी संयुक्तरीत्या सापळे रचले. परंतु आरोपी हे वारंवार चकवा देत होते. घटनास्थळापासुन ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासले. संबंधित गुन्हा मारुती ऊर्फ गोविंद आंधळे आणि शरद बापु पवार यांनी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आंधळे हा अहिल्यानगर ते शिरूरला स्पोर्टस बाईकवरुन येणार असल्याची माहिती अमंलदार उमेश कुतवळ यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शिरुर हददीत सतरा कमान पुलाच्या अलीकडे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एपीआय दत्ताजीराव मोहिते, एपीआय कुलदिप संकपाळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ, थोरात, दत्ता शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, संतोष सांळुखे, खरबस, साळवे यांनी केली. *८ गुन्हे उघडकीस, १० तोळे सोने जप्त* स्पोर्टस बाईकवरून प्रवास करीत आरोपींनी शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी देवाची, अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत परिसरात गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली दुचाकी, ८ गुन्हयातील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
गुन्हेगारी

पावसामध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशावरुन खुनाची उकल

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे – पावसामध्ये चमकलेल्या वीजेच्या प्रकाशातून भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या खुनाची उकल केली आहे. याप्रकरणी […]