Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोक्कातील आरोपी घरी आला अन जाळ्यात सापडला

युनीट तीनची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यासह तीन गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनीट तीनला यश आले आहे. तो गुपचूपरित्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. अभिजित उत्तम गोरडे (वय ३३ , रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, अशिष गार्डन जवळ, कोथरुड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा कोथरुड मधील दोन गुन्ह्यात व वारजे मधील एका गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

पुणे स्टेशन परिसरात दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी रोखली – सविस्तर बातमी

मोक्कातील गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार युनीट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, एपीआय ज्ञानेश्वर ढवळे यांच्यासह पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस हवालदार संदिप शेळके आणि नितीन जगदाळे यांना मोक्का गुन्ह्यातील आरोपी घरी आल्याची माहिती मिळाली. पथकाने आशिष गार्डनजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, एपीआय ज्ञानेश्वर ढवळे, शेळके, जगदाळे, बोडरे, तुपसौंदर, साठे, काटकर, वागस्कर यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×