Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

कोंढवा परिसरात सव्वा लाखांच्या गांजा जप्त

दोघांना अटक, अनेक महिलांवर अत्याचाराची शक्यता

महिलेसह साथीदाराला अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी सव्वा लाख रुपयांचा अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या तरुण साथीदाराला अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहात अटक केली असून मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अली चौद पाशा शेख (वय २१, रा. रामटेकडी, हडपसर) आणि शबाना मतीन सय्यद (वय ३१, रा. कोंढवा, पुणे) यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार पृथ्वीराज किसन पांडुळे यांनी फिर्याद दिली आहे.

विषारी दारू प्रकरणात दोन रासायनिक पदार्थ पुरवठादारांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जून रोजी रात्री सव्वाअकरा वाजता महात्मा फुले वसाहत येथील रस्त्याच्या कडेला ही कारवाई करण्यात आली. कोंढवा पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून ४०२ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल आणि ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण १ लाख १५ हजार ४५० रुपयांचा ऐवज जप्त केला.

हांडेवाडी परिसरात पिस्तूल, काडतुसांसह दोघांना अटक

हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावरील एका घरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन जणांना काळेपडळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. याप्रकरणी आकाश संतोष भारती (वय २७, रा. उरुळी कांचन, पुणे) आणि दीपक राम बिस्त (वय २०, रा. हांडेवाडी, पुणे) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार विशाल रमेश ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ जून रोजी रात्री सव्वाएक वाजता हेवन पार्क जवळील एका खोलीत ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून आरोपींनी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगली होती. पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×