Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

विषारी दारू प्रकरणात दोन रासायनिक पदार्थ पुरवठादारांना अटक

आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

marathinews24.com

पुणे – दापोडी आणि हडपसर परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिऊन झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) हातभट्टीच्या दारूसाठी रासायनिक पदार्थ पुरवणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून विविध पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अरुण जगदंब चौबे (वय ५९) आणि अभिषेक.अरुण चौबे (वय २४, दोघे रा. वाशीगाव, नवी मुंबई) अशी नवी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पार्टटाईम नोकरीचे आमिष पडले ६ लाखांना – सविस्तर बातमी

दापोडी पोलिस ठाणे आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ ते २८ मे २०२६ या कालावधीत विषारी हातभट्टीची दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यासह हडपसर पोलिस ठाण्यातही भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान विषारी रासायनिक पदार्थांची साखळी उलगडत सीआयडी ने अरुण चौबे आणि अभिषेक चौबे या बाप-लेकाला ताब्यात घेतले. या दोघांवर हातभट्टीच्या दारूसाठी विषारी रासायनिक पदार्थ पुरवल्याचा आरोप आहे. आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले असून ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती देखील सीआयडीने दिली.

ही कारवाई सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधिक्षक शामराव काळे आणि सचिन चव्हाण हे करत आहेत. तपास अधिकारी श्यामराव काळे, पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे (हडपसर पोलीस ठाणे प्रकरण) सचिन चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे (दापोडी पोलीस ठाणे प्रकरण) करत आहेत. गुन्ह्याबाबत कोणाकडेही अधिक माहिती असल्यास संबंधित तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×