Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील पहिल्या मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे पुण्यात उद्घाटन

‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे जिल्ह्यात कुठेही दस्त नोंदणी; नागरिकांना अत्याधुनिक सुविधा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

marathinews24.com

पुणे – नागरिकांना मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, आधुनिक आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिले मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील नोंदणी कार्यालये आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कोथरूड येथील रिव्होलेशन मॉलमधील या कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले.

मतदारांनी बीएलओंशी संपर्क साधून एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन – सविस्तर बातमी

बावनकुळे म्हणाले, “मुद्रांक व नोंदणी विभागाकडे येणारा प्रत्येक नागरिक हा आमचा ग्राहक आहे. रजिस्ट्री करणारे, दस्त लिहून देणारे आणि दस्त लिहून घेणारे यांना उत्कृष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी मुद्रांक व नोंदणी कार्यालये चांगली, सुसज्ज आणि दर्जेदार असावीत, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. त्यानुसार राज्यातील पहिले मॉडेल कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आले आहे.”

‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे कुठेही नोंदणी शक्य

‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, आता जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या मालमत्तेची दस्त नोंदणी त्याच जिल्ह्यातील कोणत्याही सक्षम नोंदणी कार्यालयात करता येते. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करण्याची सक्ती राहिलेली नाही.

पुणे जिल्ह्याचे उदाहरण देताना श्री. बावनकुळे म्हणाले, “बारामतीची रजिस्ट्री पुण्यात करता येते. त्याचप्रमाणे इंदापूर, दौंड, जुन्नर, मावळ, खेड किंवा पुणे जिल्ह्यातील कोणत्याही भागातील मालमत्तेची नोंदणी नागरिकांना त्यांच्या सोयीच्या कार्यालयात करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.”

नागरिकांना उत्कृष्ट सुविधा देण्यावर भर

मॉडेल कार्यालयाच्या संकल्पनेबाबत श्री. बावनकुळे म्हणाले, “नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात चांगले वातावरण, व्यवस्थित प्रतीक्षा व्यवस्था आणि आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना सन्मानपूर्वक सेवा मिळावी, यासाठी या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे.

“मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. नागरिकांना कार्यालयात वारंवार येण्याची गरज पडू नये, अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध व्हाव्यात आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी विभागाचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

राज्यभर मॉडेल कार्यालये उभारणार

पुण्यातील मॉडेल कार्यालय हे राज्यातील इतर नोंदणी कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. “पुण्यातील हे पहिले मॉडेल कार्यालय केवळ एक कार्यालय म्हणून न पाहता, भविष्यातील नोंदणी व्यवस्थेचा नमुना म्हणून पाहिले पाहिजे. नागरिकांना उत्तम सुविधा देतानाच कार्यालयीन कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“नागरिकांना सन्मानपूर्वक आणि त्रासमुक्त सेवा मिळणे, नोंदणी प्रक्रियेतील अडचणी कमी होणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा अधिक जलद होणे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’, ‘ई-प्रमाण’ आणि अशा डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून मुद्रांक व नोंदणी विभागाची सेवा व्यवस्था अधिक नागरिकाभिमुख करण्यात येत आहे,” असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×