हडपसर पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात वाहन चोरीसह घरफोडीचे गुन्हे करणार्या रेकॉर्डवरील चोर राजासह तिघांना अटक करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. टोळीकडून ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. राजेश राम पपुल (वय ४० रा. सच्चाई माता मंदिर दुगड चाळ, कात्रज ) प्रदीप ऊर्फ गणेश बाळासाहेब गाडे (वय ३५ रा. गगनगिरी हाईटस नांदेड सिटी) सराफ कुणाल रुपेश वाफगांवकर (वय वय २३ रा. मंदार अर्पाटमेंन्ट दांगट पाटीलनगर सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जबरी चोर्या करणार्या दोघांना बेड्या, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी
आरोपी राजेश पपुल हा पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, यापुर्वी त्याच्याविरूद्ध पुणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ४० हून अधिक मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत. तो चोर राजा नावाने ओळखला जातो. तसेच आरोपी प्रदीप ऊर्फ गणेश बाळासाहेब गाडे याच्याविरूद्धही पाच गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने हडपसर पोलिसांकडून तपास केला जात होता. १७ जानेवारीला घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्ही दिसून आले होते. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणात पोलिसांनी चोर राजा पपुलला निष्पन्न केले. त्यानुसार त्याच्यासह गाडेला ताब्यात घेत अटक केली होती.
दाखल गुन्हा केल्याची कबुली देत इतरही गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासात त्यांच्याकडून हडपसर ठाण्यातंर्गत दाखल ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हयातील सोन्याचे दागिने हे सोनार कुणाल वाफगावकर (रा. सिंहगडरोड) याला विकल्याचे आरोपींनी सांगितले होते. तपासासाठी त्याला हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी पाठविली होती. मात्र, सोनार पोलिसांना तपासाला गैरहजर राहिल्यामुळे त्याला अटक केली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अनिल बिनवडे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, सागर ननवरे, दत्तात्रय खेडेकर यांनी केली.
पोलीसांचे कौशल्य, ७०० किलोमीटरवर तपासले सीसीटीव्ही
सराईत चोर राजाने पोलिसांपासून दूर राहण्यासाठी अनेक मार्ग अवलंबल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आपल्याला पकडू नये, यासाठी त्याने वेळोवेळी दुचाकी बदलणे, रिक्षाचा वापर, कपडे बदलणे, मास्क लावण्याची खबरदारी घेतली होती. मात्र, तरीही हडपसर पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस अधिकार्यांसह अंमलदारांनी ३ महिन्यात रांजगणगाव ते कात्रज भागात सुमारे ७०० हून अधिक किलोमीटर धुंडाळला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून, आरोपी चोर राजाचा माग शोधून काढला आहे.