Breking News
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड

पिस्तूल बाळगणार्‍या तिघांना बेड्या, ३ पिस्तूल ९ काडतुसे जप्त

गुन्हे शाखेच्या युनीट दोनसह भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – गावठी पिस्तूल बाळगणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट दोनमधील कॉप्ससह भारती विद्यापीठ पोलिसांच्या अमलदारांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ पिस्तूला ९ जिवंड काडतुसे, ३ मोबाइल, दुचाकी असा ३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अनिकेत संजय मालपोटे (वय २२ रा. सुतारदरा दत्तनगर कोथरूड ) गौरव गणेश तेलंगे (वय १९ रा. शिवाजीनगर) निखिल मुकेश तुसाम (वय १९ रा. येराई रोड केळेवाडी कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठाचे चैन चोरीला – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखेच्या युनीट दोनमधील कॉप्स २४ मधील कात्रज मार्शल आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे शिपाई १५ जूनला संध्याकाळी कात्रज जुना घाटात पेट्रोलिंग करीत होते. अमलदार कृष्णा म्हस्के, सौरभ साळवे हे पेट्रोलिंग करत असताना जगजीत इंजीनियरिंग श्री लक्ष्मी गॅरेज समोरील मुख्य रस्त्यालगत तिघेजण दुचाकीसह उभे होते. अमलदारांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता ते कावरेबावरे होऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या कमरेचा भाग फुगीर दिसल्यामुळे त्यांना अडवून त्यांची झडती घेतली. त्यावेळी सराईत अनिकेत मालपोटे याच्यासह इतरांकडे ३ गावठी पिस्तूल, दोन एक्स्ट्रा मॅक्झिन ९ जिवंत राऊंड मिळून आले.

आरोपी अनिकेत मालपोटे हा सराईत गुन्हेगार असून, तो साथीदारांसमवेत घाट परिसरात कशासाठी थांबला होता. त्याने पिस्तूल कोणाकडून खरेदी केले आहे. त्याच्याकडील शस्त्र कोणत्या गुन्ह्यासाठी वापरले जाणार होते. याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. तिघांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात् शस्त्र अधिनियम ३(२५) महाराष्ट्र पोलीस अधि.३७,(१),(३),१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top